नवाब मलिकांवरील कारवाईनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने कारवाईचा बडगा उचलला आहे. ईडीने पहाटेच नवाब मलिकांच्या घरी जाऊन कारवाई केली. मलिकांवर झालेल्या या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
कशाची केस काढली त्यांनी?, साधा कार्यकर्ता असला की दाऊदचं नाव काढायचं आणि अडकवायचं, असले प्रकार सुरू आहेत. जे लोक केंद्रांच्या विरोधात स्पष्ट आणि थेट भूमिका मांडतात त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे, असा घणाघात शरद पवार यांनी केला आहे.
यात काही नवीन नाही. कुठलं तरी प्रकरण काढुन मलिकांना अडकवलं जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती. आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढुन त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होती. त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, नवाब मलिक आज सकाळी पावणे आठच्या सुमारास ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. कुख्यात गुंड दाऊद ईब्राहिमच्या मालमत्तांवर छापा टाकल्यानंतर डी गँग आणि राजकीय नेत्यांच्या कनेक्शनचा तपास सुरू असल्याची माहिती होती. या प्रकरणातच मलिकांची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
दूध ना साखर, ब्लॅक कॉफीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?
मोठी बातमी! नवाब मलिक ईडीच्या कार्यालयात, चौकशीला सुरूवात
नोकरी करत करू शकता ‘हा’ व्यवसाय, महिन्याला मिळतील जास्तीचे 30 हजार
सकाळी उठताच तुम्हालाही ‘या’ गोष्टी करायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा
भाजप-सेनेची युती होणार?, ‘या’ भेटीमुळे चर्चांना उधाण
Comments are closed.