बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डाॅ. शरद पवार! शरद पवारांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ पदवी बहाल

अहमदनगर | गुरवारी राहूरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 35 वा दीक्षांत समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी बहाल करण्यात आली आहे. या बहूमानासाठी मी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आभार मानू इच्छितो, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. कृषी विद्यापीठाच्या पदवीमुळे आता शरद पवार यांच्या नावापुढे डॉक्टर पदवी लागली आहे.

कृषी हा माझ्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय असून त्यात सखोल ज्ञान प्राप्त करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. त्या अभ्यासाचा हा गौरव आहे, असे मी मानतो. तसेच कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञान प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असं म्हणत शरद पवार यांनी आभार व्यक्त केले आहेत.

दरम्यान, मी कृतज्ञतापुर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो. देशभरातल्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केलं त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो, असं म्हणतं शरद पवार यांनी शेतकऱ्यांना हा सन्मान अर्पण केला आहे. शरद पवार यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘अटकेपूर्वी 3 दिवस आधी…’; समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

“ड्रग्ज हे जीवनाश्यक, ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे”

मोठी बातमी! अखेर आर्यन खानला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

‘मी मागासवर्गीय असल्यामुळे…’; समीर वानखेडेंची मागासवर्गीय आयोगाकडे धाव

ट्विटरवर हरभजनची गुगली! पाकिस्तानच्या महिला पत्रकाराला म्हणाला, ‘गेट लाॅस्ट…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More