Sharad Pawar | राज्याच्या राजकारणात आतापर्यंत कधी झालं नव्हतं ते आता झालेलं पाहायला मिळतेय. गेल्या काही महिन्यांआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यामुळे केवळ पक्षच नाहीतर कुटुंबात उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर हा वाद कुटुंबावर गेला. एका सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी जर साहेबांचा मुलगा अशतो तर नसती का? होय मिळाली असती पण साहेबांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
एका मुलाखतीत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतला. मी अजित पवार यांच्यासाठी काय कमी केलं. मी त्यांना सत्तापदे दिली. सुप्रिया सुळे यांना केवळ खासदारकी दिली. मी पुतण्या आणि मुलगी असा भेद कधीच केला नाही. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पलटवार करत समाचार घेतला.
काय म्हणाले शरद पवार?
मी शरद पवार (Sharad Pawar) यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी दिली नाही का? होय म्हणूनच संधी दिली नाही, असा आरोप अजित पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. त्या आरोपाला शरद पवारांनी उत्तर दिलं. मी कधीही पुतण्या आणि मुलगी असा भेद केला नाही. मी सुप्रियाला खासदारकी दिली म्हणून ती दिल्लीत पक्षाची सध्या गटनेता आहे. ती दिल्लीच्या राजकारणात आहे. परंतु तिला कधीही सत्तापद दिलं नाही. दुसरीकडे अजित पवार यांना कायमच सत्तापद दिले.
अजित पवार यांना राज्यात मंत्रीपद दिलं कॅबिनेटमंत्री पद दिलं. एक दोन नव्हे तर तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे. विधिमंडळात गटनेतेपद दिलं. विरोधी पक्षनेते पद दिलं आणखी काय हवं होतं?, असा सवाल शरद पवार यांनी अजित पवार यांना केला.
अजित पवारांचा दावा शरद पवारांनी खोडला
विरोधात राहून विकास करता येत नाही, असा दावा अजित पवार यांनी केला होता. मात्र आता अजित पवार यांनी केलेला दावा शरद पवार यांनी खोडला आहे. त्यावेळी बोलत असताना त्यांनी स्वत:चं उदाहरण दिलं आहे.
56 वर्षाच्या राजकीय कारकिर्दित आम्ही केवळ 20 वर्षे सत्तेत होतो. इतर सर्व काळ हा विरोधी पक्षात घालवला. देशात अनेक दिग्गज नेत्यांनी विरोधी पक्षात राहून आपले स्थान निर्माण केले, असं शरद पवार म्हणाले आहेत.
News Title – Sharad Pawar Replied To Ajit Pawar About That Statement
महत्त्वाच्या बातम्या
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या लेटेस्ट किंमती
“बॉयफ्रेंडने बाथरुममधला व्हिडिओ..”; पुनम पांडेचा पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा
‘या’ भागांत तापमान जाणार 40 शी पार?; हवामान विभागाचा हायअलर्ट
चेन्नईला नमवत RCB प्लेऑफमध्ये; विराटला अश्रु अनावर, Video व्हायरल
‘या’ राशीच्या व्यक्तींना व्यवसायातून मोठा धनलाभ होईल!