“अजित पवारांची ओरिजनल राष्ट्रवादी”, सुनील तटकरेंच्या विधानावर शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar | लोकसभा निवडणूक झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षाचा कारभार स्विकारला. आपले काका आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडून पक्षावर आणि चिन्हावर दावा केला. या महाभारतानंतर लोकसभा निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत शरद पवारांनी सर्वाधित लीड घेतल्याचं दिसून आलं. त्यावर काल परवा खासदार सुनील तटकरेंनी ओरिजिनल राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) पलटवार केला.

कोल्हापूरात शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि खरी राष्ट्रवादी कोणाची याचं गणित मांडलं आहे. हे गणित नवीन नाही. मात्र याचा फायदा आता विधानसभेत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे हा महायुतीसाठी धोक्याची घंटा तर नाही ना? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. याची राज्यभरामध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

शरद पवारांनी दिलं खणखणीत उत्तर : 

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी सभागृहात खरी राष्ट्रवादी कोणाची? असा सवाल केला होता. त्यावर शरद पवारांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. तर आज कोल्हापूरात पत्रकार परिषदेत त्यांनी खणखणीत उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ते कळालं ना आता लोकांना, तिकडे एक माणूस निवडून आलाय. आणि आम्ही इकडे एकूण 8 निवडून आलो आहे. नाहीतर आता 9 जागा निवडून आल्या असत्या. त्यातील एक जागा ही पिपाणी आणि तुतारी चिन्हाच्या संभ्रमामुळे गेली असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जात असल्याचं म्हणाले होते. त्यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजप सोबत हातमिळवणी केली. अशावेळी ही बाब मतदारांना पटलेली नाही. त्यामुळे अजित पवारांना राज्यातील लोकसभा निवडणुकीत विजयाचं खातं खोलता आलं आहे. तसेच आता भाजप नेत्यांकडून अजित पवारांना बाजूला केलं जात असल्याची शक्यता आहे.

अजित पवार भाजपच्या अवघड जागेचं दुखणं :

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवारांनी भाजप अजित पवारांना बाजूला काढत असल्याचं वक्तव्य केलं होतं. भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांना महायुतीतून काढून टाकण्याबाबत वक्तव्य केलं होतं. आम्हाला सत्तेत अजित पवार नको असल्याचं ते म्हणाले होते.

तर दुसरीकडे शरद पवारांनी गुगली टाकत मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, ज्यांनी आरोप केले नाही त्यांचा विचार केला जाईल. ज्यांनी आरोप केले त्यांना पक्षात घेण्यात येणार नसल्याचं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.

News Title – Sharad Pawar Replied To Sunil Tatkare And Ajit pawar About Original NCP

महत्त्वाच्या बातम्या