“नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”; मोदींच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिंडोरी येथे भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचारसभेला हजेरी लावली होती. या सभेत मोदी यांनी कॉँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षाबाबत मोठा दावा केला होता. त्याला आज (16 मे) स्वतः शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मोदी यांनी आगामी काळात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी चांगलीच भडकली आहे.

उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत मोदींच्या या वक्तव्यावर सडेतोड प्रत्युत्तर दिलं. तर, आज पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधत टोलेबाजी केली.

काय म्हणाले शरद पवार?

“याबाबत मीच सुचवलं होतं की, काँग्रेसची विचारधारा जोपासणारे, काँग्रेसच्या विचारधारेवर चालणारे अनेक पक्ष आहेत. मी केवळ विचारधारेबद्दल बोलतोय.काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक पक्ष विखुरले आहेत. त्यामुळे सारख्या विचारधारा असणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार करायला हवा. तसं करणं खूप उपयुक्त ठरेल. हा माझा विचार होता. मात्र यामुळे मोदींना कसला त्रास झाला ते मला समजलं नाही.”, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.

“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं स्थान काय?”

पुढे शरद पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्याबद्दलही एक सवाल केला. “शरद पवारांनी याआधी अनेक राजकीय पक्ष फोडण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आता त्यांचा पक्षदेखील फुटला आहे.”, असं राज ठाकरे म्हणाले होते.

यावर बोलताना शरद पवार (Sharad Pawar ) म्हणाले की, “राज ठाकरे नक्की काय म्हणाले ते काही मला माहिती नाही. त्याचबरोबर राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं स्थान काय आहे हे देखील मला माहिती नाही.”

News Title –  Sharad Pawar reply to Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या-

राखी सावंतची प्रकृती अत्यंत खालावली, जीवनमरणाचा संघर्ष?; जवळच्या व्यक्तीकडून अपडेट

केरळनंतर राज्यात मान्सून कधी दाखल होणार?; हवामान खात्याकडून मोठी अपडेट

क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान हायव्होल्टेज लढत

मतदानाच्या आकडेवारीने आढळरावांचं टेंशन वाढवलं; कोल्हेंना फायदा होणार?

लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत