बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानीसाठी शरद पवार जबाबदार”

पुणे | गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या घरावर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राज्यातील वातावरण जोरदार पेटल्याचं पहायला मिळालं. राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी तर आंदोलन करत याचा निषेध नोंदवला होता. अशातच आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या (S.T. Worker) नुकसानीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जबाबदार आहेत, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर दगडाने हल्ला केला नाही, तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र माझ्या वाहनावर दगडाने हल्ला होऊन देखील माझ्यावरच गुन्हा दाखल केला गेला, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. कारण, तुम्ही 50 वर्ष त्या लोकांचं नेतृत्व केलं. विलिनीकरणाची आशा त्यांनी लावली, असा घणाघातही पडळकरांनी केलेला पहायला मिळाला.

दरम्यान, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले पहायला मिळाले.

थोडक्यात बातम्या – 

राज ठाकरेंना धमकीचा फोन, केंद्र सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, राजेश टोपे ‘या’ कारणामुळे नाराज

मोठी बातमी! नवाब मलिकांना न्यायालयाचा मोठा झटका

राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना इशारा, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More