Top News महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या ‘या’ दाव्याने राजकारणात खळबळ, भाजपला हादरा!

मुंबई |   “राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी भाजपबरोबर कधीच चर्चा केली नाही. शिवसेनेला दूर ठेऊन आपण सरकार बनवू हा प्रस्ताव भाजपनेच मला दिला”, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या तिसऱ्या आणि अंतिम भागात त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना पवारांनीच आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं, असा दावा करून संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या दाव्यावर पवारांनी आजच्या मुलाखतीतून पलटवार केला.

“शिवसेनेला आम्हाला सरकारमध्ये घ्यायचं तुम्ही सरकारमध्ये येऊन आम्हाला साथ द्या असे भाजपचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते, असा दुसरा गौप्यस्फोट करत आमच्यातल्या काही सहकाऱ्यांशी तसंच माझ्याशी देखील भाजप नेते याविषयावर बोलले… बोलले नाही हे खरे नाही.. एकदा नाही… दोनदा नाही…. तीनदा बोलले….” असं पवारांनी सांगितलं.

“त्यामध्ये त्यांची अशी अपेक्षा होती की पंतप्रधान मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मी राष्ट्रवादी-भाजप सरकार बनवलायला संमती द्यावी परंतू ज्यावेळी माझ्याकडे हा निरोप आला त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांच्या कानावर एखाद्या पक्षाबद्दल चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून मी स्वत: संसदेत त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. जमलं तर आम्ही शिवसेनेबरोबर सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू पण आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही”, असा दावा पवारांनी यावेळी केला.

पुढे बोलताना पवार म्हणाले, “पंतप्रधानांना ही गोष्ट सांगायला जाताना एक गृहस्थ संसदेमध्ये माझ्या शेजारी होते ते म्हणजे संजय राऊत, मी त्यांच्या चेंबरमधून परत आलो तेव्हाही राऊत तिथेच होते. पंतप्रधान आणि माझ्यामध्ये काय चर्चा झाली हे देखील मी राऊतांच्या कानावर घातलं” असं सांगायला देखील शरद पवार विसरले नाहीत.

महिला पोलिसासोबत गैरवर्तन; मंत्र्याच्या मुलासह 2 जणांना अटक

कोरोनानंतरचा पहिलाच क्रिकेट सामना; ‘या’ संघानं मिळवला थरारक विजय

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या