बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राष्ट्रवादी’ काँग्रेस पक्षात विलिनीकरणाबाबत शरद पवार म्हणतात…

मुंबई | पक्ष विलिनीकरणाची बातमी ही अफवा होती. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व कायम राहील, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे.

काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षात विलिन होईल, अशा बातम्या प्रसारित होत होत्या. यासंदर्भात शरद पवारांनी फेसबुक पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी मुंबई येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवार बोलत होते.

ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली. ही बातमी साफ खोटी आहे, असं शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-मोदी सरकार ब्रिटीशांच्या काळासारखे; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

-गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

-या अभिनेत्रीसोबत अफेअर करायला आवडेल; कतरिना कैफचा खुलासा

-बैठकीत मोबाईल आणायचे नाहीत; योगींचे मंत्र्यांना आदेश

-काजल म्हणते, ‘आहे त्या रुपात स्वत:ला स्विकारा’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More