बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा, आम्हालाही तयारीला लागता येईल”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षांमध्ये चलबिचल असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा तर केलीच, पण त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोलेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काल शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची सिल्वर ओकवर बैठक झाली. यावेळी त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे. वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा, आम्हालाही तयारीला लागता येईल, असं पवारांनी म्हटलं आहे.

पक्ष वाढवण्यासंदर्भात कोणाचंही दुमत नाही. परंतु सोबत असलेल्या पक्षांना दुखावणे योग्य नाही. वेगळे लढण्याचं जर दिल्लीवरून ठरलं असेल तर आम्हाला काही अडचण नाही किंवा नाना पटोलेंना अधिकार दिले असतील तर तसं सांगा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवारांविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले होते की, शरद पवार राष्ट्रपती होणार असतील तर आम्हाला आनंद होईल. त्यासोबतच महाराष्ट्रातील नेता राष्ट्रपती होत असेल तर आनंदच होईल. परंतु राष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय पातळीवर काही प्रक्रिया सुरू झाली असेल तर मला त्याबाबत माहीत नाही.

थोडक्यात बातम्या –

मिर्झा गालिब यांच्या नावानं चुकीची शायरी शेअर केल्यानं अमिताभ बच्चन झाले ट्रोल!

‘शरद पवार राष्ट्रपती होणार असतील तर….’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

कोरोना निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना

मोठी बातमी! आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ

“मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्ये आवाज उठवण्याची हिंमत पण….”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More