बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं”; शरद पवार भाजपवर संतापले

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विरोधी पक्ष सातत्याने टीका करताना दिसत आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांना ईडीची नोटीस देखील आली आहे. मागील काही घटनांचा विचार केला तर राज्यातील राजकीय वातावरण सध्या केंद्रीय यंत्रणा भोवती फिरताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

केंद्रीय संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्याने केंद्र सरकारक़डून टाकण्यात येत आहे. सीबीआय, ईडी, एनसीबी यासारख्या केंद्रीय संस्थांचा वापर राजकीय दृष्टीने केला जात असल्याचं सध्या चित्र आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्तांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले. ते सध्या कुठे आहेत?, त्यांचा सध्या पत्ता नाही. जबाबदार अधिकारी जबाबदार मंत्र्यांबाबत असे आरोप करत आहेत, असं कधीही यापूर्वी घडलं नव्हतं, असंही शरद पवार म्हणाले.

शिवसेनेचे नेते अनिल परब, खासदार भावना गवळी, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे महाविकास आघाडीतील नेते सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.

दरम्यान, अलिकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर ईडीने छापे टाकले होते. पार्थ पवार यांच्या कार्यालयाबरोबरच अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी देखील ईडीने चौकशी केली होती. ईडीच्या या चौकशीबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय हेतूनं केला जात असल्याचा आरोप आघाडीतील नेते भाजपवर करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

घरगुती गॅसची किंमत चक्क दुप्पट; एका सिलिंडरची किंमत अडीच हजार रुपये?

चिंताजनक ! कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये आता आढळली नवी बुरशी

आई कुठे काय करते? मालिकेतील अभिनेत्रीने वाढदिवसाला केलेल्या ‘या’ कामाचं सर्वत्रच कौतुक

“पोलिसांकडून खंडणी वसूली करून घेतली की असे राक्षस बोकाळणारच दादा”

“लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More