बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर- शरद पवार

रायगड | राज्यासह देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. नागरिकांनाही पहिल्याप्रमाणे कोरोनाची भीती राहिलेली नाही. नागरिक विनामास्क बाहेर पडत असून लग्न-समारंभाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. रायगडमध्ये रोहा येथे ते बोलत होते.

राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर आहेत. प्रत्येकाने खबरदारी घेण्याची जास्त आवश्यकता आहे. कोरोना विषाणू घातक आहे, त्यामुळे काळजी घ्या, असं आवाहन शरद पवारांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे. रोहामध्ये बोलताना पवारांनी गाडीतून येत असताना नागरिक विनामास्कचे फिरत असल्याचं पाहिल्यावर त्यांनी सर्वांना सावध केलं आहे.

लोकांनी मास्क वापरणं सोडून दिलं आहे मात्र त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. याबद्दल जे जाणकर लोकं आहेत त्यांच्याशी माझा संपर्क असतो. देशाच्या आरोग्य खात्याशी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी मी गेल्या दोन दिवसांपासून बोलत आहे. तर त्यांनी मला सांगितलं शासन कदाचित या निष्कर्षावर येईल, हा विषाणू थोडा वेगळा आहे. जास्त घातक आहे त्यामुळे काळजी घेतली नाही तर आपल्याला परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे असं शरद पवारांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला.

दरम्यान, पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याची वेळ आली त्यामुळे आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल ही सूचना कोरोना आपल्याला देत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मारुती सुझुकी देणार ग्राहकांना पर्याय; पेट्रोल-डिझेलपासून सुटका

…तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावा लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाचा धसका! आता ‘या’ जिल्ह्यात घेण्यात आला संचारबंदीचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अमरावती शहरात ‘इतक्या’ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर

काँग्रेसच्या जनआक्रोश राॅलीत डान्सरचे ठुमके, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More