Top News महाराष्ट्र मुंबई

तेव्हा मात्र मला मोठा धक्काच बसला अन् समजलं की…..- शरद पवार

मुंबई |  शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दै. सामनासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी आर्थिक, सामाजिक राजकीय या सगळ्यांवर भाष्य करताना कोरोनानंतर बदलत जाणारं जग तसंच त्याचा झालेला परिणाम यावर भाष्य करताना मराठी माणसाच्या जगभरातल्या अनेक देशातल्या वास्तव्याने पवारांनी धक्का बसल्याचं सांगितलं.

जगभरातल्या अनेक देशांत मराठी माणूस पोहचला आहे. लॉकडाऊनमध्ये हे मला प्रकर्षाने जाणवलं. अनेकांना मला मदतीसाठी फोन केले. तेव्हा मला खऱ्या अर्थाने धक्का बसला की जगातल्या अमुत-तमुक देशांत देखील मराठी माणूस वास्तव्याला आहे, असं पवार म्हणाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, “मला आश्चर्याचा धक्का केव्हा बसला जेव्हा फिलीपाईन्समधून मेडिकल एज्युकेशन घेणारी 400 मुलं परत आणण्याची व्यवस्था मला करावी लागली. ताश्कंदमधून 300 ते 350 मुलं परत आणण्याची विवस्था देखील मी केली. इंग्लंड अमेरिकेचं ठीक आहे पण हे जे देश आहेत या देशांत एवढ्या मोठ्या संख्येने आपले विद्यार्थी आणि लोक गेले आहेत हे माहितीच नव्हतं. जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय आणि मराठी हे दोन्हीही बघायला मिळाले आणि हे कोरोनामुळेच शक्य झालं.”

“विशेषत: लॉकडाऊनच्या दोन पहिल्या दोन महिन्याच मुंबईतल्या घरात बसून एक काम फार करावं लागलं. ते असं की अनेक देशांमधून टेलिफोन यायचे की आमच्या देशात इतके इतके भारतीय आहेत. त्यांना परत यायचंय. त्यांच्या परतण्यासाठी विमानाच्या व्यवस्थेसाठी सहकार्य करा”.

“कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थिती याकडे आपण एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. हे संकट आहे. या संकटामुळे पहिल्यांदा लक्षात आलं की जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय कुठे कुठे पोहचलेत”.

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

उद्धव ठाकरे देखील ‘त्याच’ वाटेने पुढे चालले आहेत- शरद पवार

साताऱ्याची ती पावसातली सभा आता परत होईल?, शरद पवारांचं खास अंदाजात उत्तर

2014 च्या भाजप-शिवसेना सरकारवर शरद पवारांचं खळबळजनक भाष्य, म्हणाले…

राम मंदिर आंदोलनाशी तुमचा संबंध आला नाही, राऊतांच्या कळीच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

आज माणूस माणसाला घाबरतोय असं चित्र आहे मग तुम्ही…., राऊतांच्या प्रश्नावर पवार म्हणाले

…तर भाजपच्या 40-50 जागाच निवडून आल्या असत्या; शरद पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीत मतभेद आहेत काय?, शरद पवारांचं धडाकेबाज उत्तर

‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या