…म्हणून मी नारायण राणेंची भेट घेतली; शरद पवारांनी सांगितलं कारण

सिंधुदुर्ग | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर शरद पवारांनी भेटीमागचं सत्य उलगडलं आहे. 

मी सिंधुदुर्गात आलो असताना राणेंनी मला फोन केला. त्यामुळे मुंबईला जाता जाता मी त्यांची भेट घेतली. ते आमचे जुने सहकारी आहेत, असं शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितलं. 

राणेंच्या घरात पाहुणचार झाल्यावर शरद पवार यांनी तुम्हाला ‘चाय पे कोणती चर्चा’ मिळणार नाही’, असं सुचक वक्तव्य केलं. 

दरम्यान, आमची भेट मैत्रीच्या संबंधी होती. त्यामुळे उलट सुलट काही छापू नका, असंही त्यांनी यावेळी पत्रकारांना बजावलं.

महत्वाच्या बातम्या-

-माजलगावच्या वादग्रस्त DYSP भाग्यश्री नवटकेंवर अखेर कारवाई

-खासदार सुप्रिया सुळे यांना ‘श्रेष्ठ सांसद’ पुरस्कार जाहीर

-समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी चक्क घुबडांचा वापर!

-चक्क पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेलं घरच गेलं चोरीला!

-शरद पवार आणि नारायण राणेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणतात…