Top News

शरद पवारांच्या निवासस्थानाची सुरक्षा काढली नाही- दिल्ली पोलीस

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी चार दिवसानंतर स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवारांच्या निवासस्थानाची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. नियमानुसार आवश्यक तेवढे पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र, पोलिसांनी चार दिवसानंतर हे स्पष्टीकरण दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पवारांची सुरक्षा काढण्यात आल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. केंद्र सरकारने सुडबुद्धीने हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षेमध्ये घट करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी चिंता व्यक्त केली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या