Sharad Pawar | राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शरद पवार यांनी केलेल्या आरोपांनी राज्यभर खळबळ उडाली आहे. विधानसभेसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाने थेट चार्टर्ड प्लेनने देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघात एबी अर्ज पाठवून राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का दिला होता. देवळालीत (Deolali) राजश्री अहिरराव (Rajshree Ahirrao) आणि दिंडोरीतून धनराज महाले (Dhanraj Mahale) यांनी अर्ज दाखल करत अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात बंडखोरी केली. (Sharad Pawar)
याची राज्यभर एकच चर्चा रंगली होती. आता याच प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिंडोरी येथे अजित पवार गटाकडून विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ तर देवळालीत आमदार सरोज अहिरे यांना तिकीट देण्यात आलं आहे. मात्र, या जागेवर शिंदे गटानेही दावा केला होता. महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाने एबी फॉर्म चार्टर्ड प्लेनने नाशिकला पाठवले होते.
शरद पवार काय म्हणाले?
यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “आम्ही अनेक जिल्ह्यांमधून तसेच काही अधिकाऱ्यांकडून ऐकत आहोत की, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पुरवली जात आहे. याबाबत मी जाहीर सांगणार होतो. पण, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये, अशी गळ घातली. याबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती असती तर मी काही केलं असतं. पण, पूर्ण माहितीशिवाय मी भाष्य करत नाही.”, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.त्यांच्या या आरोपांची राज्यभर आता चर्चा सुरू आहे.
शरद पवारांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. ” हे बिनबुडाचे आरोप आहेत. त्यात काही तथ्य नाही. असं काही असेल तर पोलिसांच्या गाड्या चेक कराव्यात. निवडणूक आयोगाची टीम असेल तर ते देखील तपासणी करू शकतात.”, असं अजित पवार म्हणाले.
फडणवीस यांचा पलटवार
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलंय.”शरद पवार यांच्या काळात असं चालायचं, आता त्यांना तसा भास होत असेल. आमच्या काळात तर असं काही होत नाही.”, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे. (Sharad Pawar)
News Title – Sharad Pawar serious allegations on mahayuti
महत्त्वाच्या बातम्या-
विधानसभेत महाविकास आघाडी मारणार बाजी?, सर्व्हेतून मोठी माहिती समोर
दिवाळी पाडव्याला मिळाली आनंदवार्ता, सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर
बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा होणार?; पार्थ पवारांकडून मोठा खुलासा
महायुतीला धक्का, शिंदेंच्या उमेदवाराला भाजपकडूनच आव्हान
संभाजीराव पाटील निलंगेकरांची ताकद वाढली, संपूर्ण निलंगा भाजपमय