बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनिल देशमुख कुठं आहेत याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं”

मुंबई | राज्यात मागील काही महिन्यांपासून विविध मुद्दे गाजताना दिसत आहेत. या मुद्दयांवरून सातत्याने भाजप महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. जलयुक्त शिवार योजनेची कामं महाविकास आघाडी सरकारने बंद केली. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान केल्यामुळं शेतकऱ्यांची माफी मागायला हवी, असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी परमबीर सिंग कुठं आहेत विचारलं आहे तर त्यांनी अनिल देशमुख कुठं आहेत याचं उत्तर द्यावं, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत. या देशात तुकडे तुकडे गँग प्रसिद्ध आहे. देशातील कोणत्याही संस्थांवर आरोप करायचा आणि अविश्वास तयार करायचा असं काम ही गँग करत आहे. याला शिवसेना पाठिंबा देत आहे का? असा सवाल देखील उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

देशातील तुकडे तुकडे गँगला पूरक काम शिवसेनेला मान्य आहे का? राष्ट्रवादी तपासात अडथळा आणत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. ड्रग्स विरोधातील मोहीम चालवायची का नाही? तसेच अधिकारी हिंदू आहे का मुस्लीम त्याचा तपासाशी काय संबंध आहे? झालेल्या कारवाईवर आक्षेप असेल तर न्यायालयामध्ये दाद मागावी. ट्विटरवर बोलून काही उपयोग नाही, असं उपाध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला काहीच काम करता आलेलं नाही. हे अपयशी सरकार आहे. राज्यातील जनतेचं लक्ष विचलीत करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. वसूलीचे पैसे जमले नाहीत का? म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत की एखाद्या महिलेविषयी बोलणे. निवृत्त अधिकाऱ्यास मारणं आणि राज्याचे माजी गृहमंत्री फरार आहेत यातून राज्याची बदनामी होत नाही का? असा खडा सवाल उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.

थोडक्यात बातम्या –

“माझं नाव ज्ञानदेवच पण, बायको मला प्रेमानं दाऊद म्हणायची”

“फडणवीस इथं येऊन गाजर वाटून गेले असतील”

कोरोना हा मोसमी आजार? वैज्ञानिकांच्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

“फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याची अवस्था मला बघवत नाही”

द बर्निंग बस! भर रस्त्यात बसने अचानक घेतला पेट अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More