बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं’; बाळासाहेब थोरातांचं पवारांना आवाहन

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेस पक्षाची तुलना उत्तर प्रदेशमधील जुन्या जमीनदारासोबत केली होती. यानंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नाना पटोले यांनी शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पवारांच्या वक्तव्याशी मी असहमत आहे. मात्र, पवारांच्या वक्तव्याचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधी पक्षांनी या वक्तव्याचा कितीही लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी, काँग्रेस पक्षाचे काहीच नुकसान होणार नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाच्या विचाराचे जे आहेत आणि राज्यघटनेच्या मुलभूत तत्वांशी जे बांधील आहेत, त्यांनी सरळ काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली यावं, असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांना केलं आहे. काँग्रेस पक्षावर टीका करण्यापेक्षा राज्यघटना टिकवण्यासाठीच्या लढाईत एकत्र यावं, असं सुद्धा थोरात यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेस हा एक विचार आहे, काँग्रेसच्या विचाराचे कठीण दिवस आले आहेत. कारण, धार्मिक तेढ करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपण सर्व विचाराने एक आहोत, त्यामुळं एकत्र आलोत तर काँग्रेस पक्षाला नक्कीच चांगले दिवस येतील, असं बाळासाहेब थोरात यावेळी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘तिचीच चूक असणार’; हेमांगी कवीची मन हेलावून टाकणारी पोस्ट

बेरोजगार युवकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय!

“हवेत गोळीबार करू नका, चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय”

साकीनाका प्रकरणानंतर नीलम गोऱ्हे आक्रमक; मुख्यमंत्र्यांना दिले ‘हेसल्ले

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार; एकजण गंभीर जखमी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More