लातूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री गणपतराव देशमुख यांना भारतरत्न, तर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना पद्मभूषण देण्यात यावे अशी मागणी आदिवासी धनगर साहित्य संमेलनाकडून करण्यात आली आहे.
आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे 28 आणि 29 मार्चला होणार आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाचे संस्थापक डॉ. अभिमन्यू टकले आणि उपाध्यक्ष संभाजी सूळ यांनी लातूर येथे पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य आर. एस. चोपडे असणार आहेत. तर स्वागताध्यक्ष प्रा. संजय शिंगाडे असणार आहेत. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगासाठी शरद पवार आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना निमंत्रण दिलं जाणार आहे.
या संमेलनात धनगर समाजाच्या अनेक मुद्यांवर परिसंवाद होणार आहे. दरम्यान, पहिले संमेलन सोलापुरात, दुसरे लातुरात, तर तिसरे संमेलन म्हसवड येथे झाले होते.
ट्रेंडिंग बातम्या-
राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
एमआयएम हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष- विश्वंभर चौधरी
महत्वाच्या बातम्या-
दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी राज ठाकरेंनी घेतली होती शरद पवारांची मुलाखत
15 कोटीच काय अख्खा पाकिस्तान आणा… आम्ही थुंकलो तरी तुम्ही उडून जाल- मनसे
…म्हणून मी मोठ्या मनाने तुमची माफी मागते- तृप्ती देसाई
Comments are closed.