Top News देश

शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी- खासदार संभाजीराजे

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. राज्यात सत्ताधारी पक्षावर विरोधक टीका करत आहेत. अशातच खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. भेटीवेळी संभजीराजेंनी एक विनंती केली आहे.

शरद पवार यांनी स्वत: मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करायल हवी, अशी विनंती संभाजीराजेंनी शरद पवारांना केली आहे. त्यासोबतच त्यांनी  महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनाही एक पत्र पाठवलं आहे.

महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनी आपापल्या परीने सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे. याकरिता मी सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाचा विषय निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे. आता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. तामिळनाडूला वेगळा  आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का?, असा प्रश्नही संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असं संभाजीराजेंनी पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

जया बच्चन यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पसंती ऑनलाईनलाच!

“सर्व खासगी रुग्णालये यापुढे सरकारनेच चालवावी”

मुंबई महापालिकेला खिसा करावा लागणार खाली?; नुकसान भरपाई म्हणून कंगणाने मागितले इतके कोटी

“हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या