Top News देश

मरकज प्रकरणावरून शरद पवार यांची नाव न घेता अमित शहांवर टीका

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी सुरूवातीलाच दिल्लीतल्या मरकज प्रकरणाला गृहमंत्री अमित शहा यांना दोषी धरत त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

दिल्लीत निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला परवानगी पोलिसांनी द्यायलाच नको होती, महाराष्ट्रात तो कार्यक्रम होणार होता. मात्र गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी ती काळजी घेतली, असं म्हणत त्यांनी सरकारचं आणि पोलिसांचं अभिनंदन केलं.

व्हॉट्सअ‌ॅपवर वर येणारे मेसेज काळजी करण्यासारखे, मात्र पाचपैकी चार मेसेज खोटे असतात, लोकांमध्ये संभ्रम, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, हे शंकास्पद आहे . दिल्लीतील संमेलनाविषयी वारंवार टीव्हीवर दाखवण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, डॉक्टर, नर्स कष्टाने काळजी घेत आहेत, घरी बसायला पाहिजे, सर्व जात-धर्मानी एकत्र राहण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, येत्या काळात रोजगार कमी होण्याची शक्यता, या संकटाला कसं तोंड द्यावं, यावर जाणकारांनी विचार करायला हवा, असंही ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

अब_आगे_क्या; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा मोदींवर निशाणा

कोरोनाला पळविण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार, पाहा व्हिडीओ

महत्वाच्या बातम्या-

तेव्हा विचारलं ‘गो कोरोना’ म्हणून जाईल का? अन् आता सगळेच म्हणतात गो कोरोना- रामदास आठवले

“मोदींनी मला चर्चेला न बोलवणं म्हणजे हा औरंगाबादच्या आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान”

अकलेचे दिवे लावणे यालाच म्हणतात, सचिन सावंतांचा भातखळकरांवर निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या