बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केलाय’; शरद पवारांचा कोश्यारींना टोला

बारामती | विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्त्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही, असं म्हणत शरद पवारांनी भगतसिंह कोश्यारींवर टीकास्त्र सोडलं आहे. ते बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असं शरद पवार म्हणालेत.

मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना देखील तत्कालीन राज्यपालांनी अशाप्रकारचा त्रास दिल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये देखील राज्यपाल याच पद्धतीने राज्यशासनाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी मात्र केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शरद पवारांनी यावेळी बोलताना शेतकरी आंदोलावरही भाष्य केलं. शेतकरी आंदोलनाला शंभर दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना खलिस्थानी, दहशतवादी संबोधत असतील तर यावर काय भाष्य करणार, असं शरद पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

…अन् तसं झालं तर ठाकरे सरकार देखील पडू शकतं- कंगणा राणावत

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

‘स्फोटकांची कार लावण्यात सचिन वाझेंचा थेट सहभाग’; NIAचे वाझेंवर गंभीर आरोप

अभिनेत्री सायली संजीवचा बोल्ड अंदाज, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More