पुणे महाराष्ट्र

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता व्यक्त केली हे चांगलं आहे, पण…- शरद पवार

पुणे | राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षितता व तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपालांनी गृहमंत्र्यांना फोन करून अर्णव गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली ते चांगले आहे. पण मला वाटतं त्यांनी ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली असती तर ते अधिक चांगले झाले असतं, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी बिहार विधानसभा निवडणुक तसेच विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या. मात्र नितीश कुमार यांचं फार नुकसान होण्याची भीती होती, तसं घडलं नाही, असं शरद पवार म्हणाले. तसेच बिहारमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, असं शरद पवार म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या-

“फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्राला पण देवेंद्र फडणवीसच पाहिजे”

संजय राऊतांचा गजनी झालाय, ते पराभव विसरतात- निलेश राणे

दुधात साखर विरघळावी तसं ज्योतिरादित्य भाजपमध्ये विरघळले- शिवराज सिंह चौहान

शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा लव सिन्हाला पराभवाचा धक्का!

“देवेंद्र फडणवीसांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या