कोल्हापूर महाराष्ट्र

सरकार पाडण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न सुरू आहेत, पण…- शरद पवार

कोल्हापूर | सरकार पूर्ण 5 वर्षे टिकणार असून यात कुठलीही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सरकार पाडण्याचे प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहेत. हा प्रकार विरोधकांकडून अखंडपणे सुरु आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.

सरकार पाडण्याचा प्रयत्न दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत होत असला तरी त्यांच्या प्रयत्नांचा काहीही उपयोग होणार नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले बलात्काराचे आरोप रेणू शर्मा यांनी मागे घेतल्यानंतर त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रेणू शर्मांनी केस परत घेतली असल्याचं समजलं. आम्हाला प्रथमदर्शनी सत्यता पडताळण्याची गरज वाटते. याच्या खोलात जाण्याची गरज आहे असं मी आधीच म्हटलो होतो. आमचा निर्णय बरोबर होता असं मला आता वाटतंय, असं शरद पवार म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

मला मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करु?; शरद पवारांचा मिश्कील सवाल

“धनंजय मुंडेंवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर कारवाई व्हावी”

धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता- शरद पवार

“बलात्काराची तक्रार मागे, तरीही ‘या’ कारणामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई करा”

बलात्काराच्या तक्रारीसंदर्भात धनंजय मुंडे यांना सर्वात मोठा दिलासा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या