औरंगाबाद महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

“सत्ता जाईल म्हणून मोदी, शहा, नड्डा सभा घेतायेत; पण सभेला 50 लोकही जमत नाहीत”

Loading...

औरंगाबाद | महाराष्ट्रातील जनतेने सरकारला सत्तेवरून खाली खेचायचं ठरवलंय. मोदी, शहा, नड्डा आणि देवेंद्र फडणवीस त्यामुळेच जागोजागी जाऊन सभा घेत आहेत आणि त्या सभांना ५० लोकही जमत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला. ते घनसावंगीत आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत पण समोर विरोधकच नाहीत, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा देखील त्यांनी समाचार घेतला. ५२ वर्षांत १४ निवडणुका मी लढवल्यात आणि त्यातील एकही निवडणूक मी हरलो नाही. तरी आताचे सत्ताधारी मला विचारतात तुम्ही काय केलं?, असं ते म्हणाले.

Loading...

शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम गेल्या ५ वर्षांपासून रखडले आहे. महाराजांचे किल्ले पर्यटनासाठी खुले करू, असं सांगितल जातं. मात्र जे किल्ले आपल्या इतिहासाचं प्रतीक आहेत, तिथं हे सरकार आता नाचगाणी आणि छमछम सुरू करणार आहे. हा महाराजांचा इतिहास आहे का?, आम्ही काय केलं? याचं खास उत्तर म्हणजे आम्ही असले धंदे केले नाहीत, असं ते म्हणाले.

राज्य सरकारने नाबार्ड संस्थेला कर्ज दिले, त्यामुळे सर्व संचालक शरद पवारांना ओळखतात म्हणून मला ईडीने नोटीस पाठवली. पण जेव्हा मी ईडीच्या कार्यालयात जाण्याचे ठरवले, तेव्हा राज्यातील वातावरण बिघडेल अशी भीती व्यक्त केली गेली आणि मला जाऊ दिले नाही, असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले.

Loading...

महत्तवाच्या बातम्या

 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या