Top News

शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले…

Photo Credit- Facebook/ Sharad pawar & Chandrakant patil

पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना शरद पवार गप्प का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागतं, अशा लोकांबद्दल मी बोलायचं का, असा टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

शरद पवार पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी पवारांनी न्याय व्यवस्थेच्या सद्यस्थितीवर माजी सरन्यायधीश रंजन गोगोई यांनी केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केलं.

रंजन गोगोई यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत धक्कादायक आहे. हे वक्तव्य म्हणजे न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर नाही ना याचाही विचार व्हावा. पण या वक्तव्यामुळे प्रत्येकाच्या मनात चिंता निर्माण होणार याबद्दल शंका नसल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

मोदींच्या कुटुंबातील व्यक्तीनं केलेल्या आरोपानं खळबळ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ‘तो’ मुलगा गायब!

पुण्यातील ‘या’ रस्त्यावर 7 किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल होणार!

अशी ही बनवाबनवी!!! ‘एक्स’ची अंगठी चोरुन केलं ‘नेक्स्ट’ला प्रपोज

आता ‘या’ मुलानं लावली सोशल मीडियावर आग, लोक परत परत पाहात आहेत व्हिडीओ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या