बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राला माहिती झाले, शरद पवारांचा हल्लाबोल

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दै. सामनाला दिलेल्या मुलाखतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसंच फडणवीसांनी राष्ट्रवादीवर केलेले आरोप आणि दावे फेटाळून लावत फडणवीस खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राला माहिती झाली, असा टोला लगावत मुख्यमंत्री होण्याअगोदर ते विरोधी पक्षातला एक जागरूक आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता, असं पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकारणातील अभ्यासाचा बेस पक्का करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

2014 ला शरद पवारांना भाजपबबरोबर सरकार बनवायचं होतं. त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर त्यांचं बोलणं सुरू होता, असा दावा फडणवीसांनी एका मुलाखतीत केला होता. त्यावर बोलताना शरद पवार यांनी फडणवीसांना चांगलेच शाब्दिक फटकारे लगावले. पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांचं डिसीजन मेकिंग प्रोसेसमध्ये काय स्थान होतं, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना माहिती झाले. त्याच्या आधी विरोधी पक्षातला एक जागरूक आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता.”

फडणवीसांच्या दाव्यावर पुढे बोलताना पवार म्हणाले, “संबंध राज्याच्या किंवा देशाच्या नेतृत्वामध्ये बसून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता, असं मला वाटतं नाही. ते म्हणतात त्याप्रमाणे मी एकदा जाणीवपूर्वक शिवसेना भाजप एकत्र येऊ नये असं स्टेटमेंट केलं एवढं मात्र खरं…”

शरद पवार स्पेशल मुलाखत बातम्या-

मोदींच्या सत्तेला सुरूंग लावण्याचा प्लॅन ठरलाय, त्यासाठी मी पुढाकार घेणार; पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

“शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढावं म्हणून जाणीवपूर्वक मी ‘ते’ काम केलं”

शरद पवारांच्या ‘या’ दाव्याने राजकारणात खळबळ, भाजपला हादरा!

…म्हणून मी 2014 ला भाजपला पाठिंबा देतो असं म्हटलं, ते ‘टॉप सिक्रेट’ पवारांनी अखेर सांगितलं !

….तर महाराष्ट्रात कोणतंही ऑपरेशन फोल ठरेल, शरद पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल का?, शरद पवारांचं ‘पॉवरफुल्ल’ उत्तर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More