पुणे महाराष्ट्र

जाहीर कार्यक्रमात शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला सल्ला, म्हणाले….!

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर कार्यक्रमात इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तंबी दिली आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित असताना आपल्या भाषणात केवळ बंधुनो… बंधुनो म्हणण्यावरून त्यांनी भरणेंना सुनावलं आहे.

काल इंदापुरामध्ये इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी हा प्रसंग घडला.

कार्यक्रमात भाषण करताना आमदार भरणेंनी अनेकदा बंधुनो… बंधुनो असा उल्लेख केला. त्यावर कार्यक्रमाला 90 टक्के महिला उपस्थित आहेत, हे तरी लक्षात घ्यायला हवे होते, असं म्हणत केवळ बंधुनो… बंधुनो म्हणाल तर येणाऱ्या निवडणुकीत काय होईल ते तुम्हाला समजेल, असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला.

दरम्यान, या कार्यक्रमात पवारांनी नावाची काय बिशाद… प्रतिभा माझ्या खिशात…!, असा उखाणा देखील घेतला.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेना म्हणते… दिलासादायक पण ‘बजेट मतांचेच’

‘त्याची’ आई कायमची जग सोडून गेली, तरीही देशासाठी क्रिकेटपटू मैदानात उतरला!

-बाळासाहेबांविरोधात पोस्ट केल्यामुळे सरपंचाला जीवे मारण्याचा प्रयत्न

“युती झाल्यास चंद्रकांत खैरे कसे निवडून येतात तेच पाहतो”

बीडच्या अपर जिल्ह्याधिकाऱ्याला 5 लाख रुपयांची लाच घेताना अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या