बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुख तेव्हा कोरोनामुळे रुग्णालयात होते, त्यामुळे…- शरद पवार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. वाझे-देशमुख भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावा शरद पवार यांनी यावेळी केला आहे.

गृहमंत्री फेब्रुवारीच्या संबंध महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असं परमबीर सिंग कशाच्या आधारावर म्हणतात?, असा सवाल शरद पवारांनी केला आहे.

सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनील देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच परमबीर सिंग यांचे आरोप तथ्यहीन आहेत, असं म्हटलं आहे. पत्रकारांनी शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का, हा प्रश्न विचारला. तेव्हा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान,राज्य दहशतवादविरोधी पथकाने हिरेन मृत्यूप्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावला. मात्र, या गोष्टीवरून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांकडून परमबीर सिंह यांच्या पत्राचा मुद्दा उचलून धरण्यात आला, असा आरोप शरद पवारांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात ‘इतक्या ‘लोकांचा सहभाग, एटीएसला मिळाली मोठी माहिती

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, उलट केंद्र सरकारच बरखास्त करा”

माही रिटन्स! मैदानावर येताच धोनीनं टोलवला 114 मीटरचा सिक्स; पाहा व्हिडीओ

धक्कादायक! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘या’ महिलेनं केली तक्रार दाखल

महिलेचा मोदींसोबत फोटो छापून आला, वास्तव समोर आल्यावर उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More