महाराष्ट्र मुंबई

‘आता मला लाज वाटायला लागली आहे’; प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला

मुंबई | आझाद मैदानावरील आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसवली आहेत. भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी, असा सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विचारला होता. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

प्रवीण दरेकर यांचं हे वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे. कारण एकेकाळी मीदेखील विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, असं म्हणत शरद पवारांनी दरेकरांवर टीकास्त्र सोडलंय.

आझाद मैदानावरील मोर्चासाठी शेतकरी एवढ्या लांबवरुन चालत आले होते. त्यांचे पाय सुजले होते, फोड आले होते. पण ते एका तडफेने आझाद मैदानावर पोहोचले होते. अशावेळी विरोधी पक्षनेत्याने खरंतर या शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती, असं पवार म्हणाले.

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने अशाप्रकारचं वक्तव्य करणं, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, असं शरद पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“आता भाजपवाले शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जो बायडन यांचा राजीनामा मागणार का?”

केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा, कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये- शरद पवार

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका- कंगणा राणावत

“राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज शरम दिसली”

14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी दोन मुलं; तरीही IPS होण्यापासून तिला कोणी रोखू शकलं नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या