“गुजरातमधून तडीपार केलेला माणूस..”; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर

Sharad Pawar | देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपुर्वी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी शरद पवार हे देशभरातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशी टीका केली होती. यालाच आज (27 जुलै) शरद पवारांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. आज ते (Sharad Pawar ) छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलं आहे. त्याच्या हातात देशाचं गृहमंत्रीपद आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावरील पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यावेळी ते बोलत होते.

अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर

“अमित शाह आधी गुजरातचे मंत्री होते. तेव्हा कायद्याचा चुकीचा वापर केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. ज्या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं, तो माणूस आज देशाचं गृहमंत्रीपद सांभाळतोय. देशाचं संरक्षण करतोय.”, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

यावेळी शरद पवार (Sharad Pawar ) यांनी अनेक जुन्या आठवणी देखील पुन्हा जागवल्या.माझ्याबद्दल इथे खूप चांगलं बोललं गेलं. मी हे पुस्तक 10 ते 12 वर्षापूर्वी लिहिलं होतं. त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या. आज जे काय घडतंय ते लिहिणं गरजेचं आहे, असं संगत त्यांनी मराठवाडा नामविस्तार आंदोलनाच्या आठवणी जागवल्या.

शरद पवारांनी जागवल्या ‘त्या’ आठवणी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला खूप चॅलेंज होते. तेव्हा मला पोलीस आयुक्तांनी खूप मेसेज केले. अनेकांचे घर जळत आहेत. निर्णय लोकांना मान्य नाही. तो बदलणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. आंबेडकरांनी संविधान लिहिलं. त्यांच्या नावाने असलेलं विद्यापीठ का नको? त्याला विरोध का? त्यावेळी सक्तीचं निर्णय घेणं गरजेचं होत. म्हणून मी निर्णय घेतला, असं शरद पवार यांनी सांगितलं.

यावेळी लातूर भूकंपाबाबतही त्यांनी भाष्य केलं.”मला रात्री 4 वाजता लातूरमध्ये भूकंप झाल्याची माहिती मिळाली. मी रात्री अधिकाऱ्यांना उठवून हेलिकॉप्टरने तिथे पोहोचलो होतो. मी मी तिथे 15 दिवस तिथे थांबून होतो. एका वर्षात 2 लाख घरे बांधली.”, असं शरद पवार (Sharad Pawar ) म्हणाले.

News Title : sharad pawar slams home minister amit shah 

महत्त्वाच्या बातम्या-

अजितदादांना झटका! बड्या नेत्याची शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार!

नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती

या आठवड्यात सोन्याचा मोठा दिलासा; 10 ग्रॅम सोनं फक्त..

दिग्दर्शक फराह खानला मातृशोक, मेनका इराणी यांचं निधन