बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विधानसभेने केलेल्या सहकार कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही”

मुंबई  |  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार काही दिवसांपूर्वी करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात दरम्यान नव्या केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना मोदी सरकारने केली आहे. या नव्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच संपूर्ण देशभरात महाराष्ट्र हे राज्य सहकार चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जातं.

नव्या केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येईल, अशा चर्चांना मोठ्या प्रमाणात उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यावरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं वक्तव्य करत ‘महाराष्ट्र विधानसभेने केलेल्या सहकार कायद्यात हस्तक्षेप करण्याचा केंद्र सरकारला कोणताही अधिकार नाही’, असं म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या सहकार खात्याची निर्मिती केल्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रामध्ये गंडांतर येईल अशा ज्या चर्चा सुरू आहेत त्यात तथ्यहिन असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी पूर्णपणे घटनेनुसार राज्य सरकारचीच असल्यामुळे केंद्र सरकार त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

संबंधित केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून राजकीय वर्तुळात विशेषतः महाराष्ट्रात अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावरच शरद पवार यांनी भाष्य केल्यामुळे येणाऱ्या काळात नेमकी परिस्थिती काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More