पवारांच्या भाषणाला सुरुवात आणि स्टेजसमोर बसलेल्यांचा हल्लाबोल!

औरंगाबाद | राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलनांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाने सांगता झाली, मात्र शरद पवार यांचं भाषण सुरु झाल्यानंतर काहीजणांनी या सभेत हंगामा केल्याचा प्रकार घडलाय. 

औरंगाबादच्या गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांनी हा हंगामा केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात आरोप केले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. शेतमालाला हमीभाव हे लबाडाघरचं आवताण आहे आणि ट्रिपल तलाक हा मुस्लिमांना धर्माने दिलेला अधिकार आहे, तो सरकारने हिरावून घेऊ नये, असं शरद पवार म्हणाले.