‘आता वेळ आली आहे’; कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर शरद पवार स्पष्टच बोलले

मुंबई | कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला.

कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्यावर चढून घोषणाबाजी केली. तसंच हे गाड्यांसमोर आणि गाडीखाली झोपले महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिका संघटनेत्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली आहे. सीमाप्रश्नावर भूमिका घेण्याची आता वेळ आली आहे, असं शरद पवार म्हणालेत.

बोम्मईच्या वक्तव्यांमुळे सीमाभागातली परिस्थीती गंभीर झाली आहे. बेळगावमध्ये जे घडलं ते निषेधार्ह आहे. महापरिनर्वाणदिनी घडलेला हा प्रकार निषेधार्ह आहे, असं शरद पवार म्हणालेत.

सीमा भागातून फोन येत आहेत. बेळगाव स्थिती गंभीर आहे.महाराष्ट्र मधून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. 19 डिसेंबर कर्नाटक विधानसभा अधिवेशन होणार आहे. सतत हे वातावरण तयार केलं जात आहे, असं शरद पवारांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More