नाना पटोलेंवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आहे. अनेक नेत्यांनी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर (Nana Patole) आरोप करत त्यांच्यावर टीका केली.

ठाकरे सरकार पडण्यास नाना पटोले (Nana Patole) जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही केला होता. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसमधील नाराजी नाट्यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

शरद पवार सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

मविआमध्ये कुठलाही वाद नाही. नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झालं आहे. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पटोलेंनी राजीनामा देतांना सगळ्यांना विश्वासात घेतलं नाही एवढीचं व्यथा आहे, पण आता तो विषय संपला आहे, असं शरद पवार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

महत्त्वाच्या बातम्या-