महाराष्ट्र मुंबई राजकारण

प्रियांका गांधींचं घर काढून घेणं हा सत्तेचा दर्प आणि क्षुद्रपणा, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई | प्रियांका गांधींचं घर काढून घेणं हा सत्तेचा दर्प आणि क्षुद्रपणा राजकारण आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मॅरेथाॅन मुलाखतीत पवारांनी प्रियंका गांधी यांना सरकारकडून मिळालेल्या वागणुकीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

पवार म्हणाले की, “इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. देशासाठी बलिदान देणारे एका कुटुंबातील दोन व्यक्ती आणि त्यांच्या आधीच्या पीढीनं संपूर्ण आयुष्य देशासाठी दिलं आहे. अशा कुटुंबातील मुलगी म्हणजे प्रियंका..पोलिटीकली वादविवाद आहेत, पण त्याचा अर्थ माझ्या हातात सत्ता आहे, त्या सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला आम्ही त्रास देऊ शकतो…यात काही शहाणपणा नाही.”

“एका माजी पंतप्रधानाच्या मुलीला दिलेलं घर तुम्ही काढून घेता आणि त्यांना आता कुठेतरी लखनौला जाऊन राहण्याची वेळ आली यात मला काहीच सुसंस्कृतपणा वाटत नाही”, असं म्हणत पवार यांनी प्रियंका यांना सरकारी बंगली मोकळा करण्याबाबतच्या आदेशाचा तीव्र शब्दात निषेध करताना सरकारवर टीकाही केली आहे.

सत्ता हातात असली की ती विनयाने वापरायची असते. सत्तेचा दर्प एकदा का जर तुमच्या डोक्यात गेला की मग अशा प्रकारच्या  गोष्टी होतात, असा विनयाचा सल्ला देखील त्यांनी केंद्रिय सरकारला दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल का?, शरद पवारांचं ‘पॉवरफुल्ल’ उत्तर!

शरद पवारांच्या ‘या’ दाव्याने राजकारणात खळबळ, भाजपला हादरा!

महिला पोलिसासोबत गैरवर्तन; मंत्र्याच्या मुलासह 2 जणांना अटक

कोरोनानंतरचा पहिलाच क्रिकेट सामना; ‘या’ संघानं मिळवला थरारक विजय

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या