बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हे वेदनादायक आहे, माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत हे कधी पाहिलं नव्हतं- शरद पवार

नवी दिल्ली | संसद हे लोकशाहीचं मंदिर असतं. लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहाच्या माध्यमातून देशाला सामाजिक न्यायाची व विकासाची नवीन सुरूवात मिळत असते. मात्र हे पावसाळी अधिवेशन विविध मुद्यांमुळे वादळी ठरलं. पेगॅसस, कृषी कायदे, आरक्षण विधेयक, विमा व्यवसाय दुरूस्ती विधेयक यावर प्रचंड चर्चा झाली.

सरकारने विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षांचं बोलणं सरकारने ऐकून घेतलं नाही. विरोधक विरोध करताना सभापतींना घेराव घालत असतात पण हे करत असताना विरोधी पक्षांच्या महिला खासदारांना जो त्रास दिला गेला हे दुर्देवी आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत आज जे राज्यसभेत घडलं, असं कधीही झालं नव्हतं. बाहेरून 40 हून अधीक महिला आणि पुरूष बोलवण्यात आले व त्यांच्या मार्फत महिला खासदारांसोबत गैरवर्तन करण्यात आलं हे वाईट होतं. हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, विमा दुरूस्ती विधेयक पटलावर ठेवलं गेलं यावर चर्चा करत असताना हा गैरप्रकार घडला आहे. काॅंग्रेस, आप, शिवसेना आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात यावं यावरून सभापतींना घेरलं पण एवढ्या गोंधळात सुद्धा सरकारने हे विधेयक मंजूर केलं.

थोडक्यात बातम्या

संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले, पाहा व्हिडीओ

“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”

हिमाचल प्रदेशातील नॅशनल हायवेवर दरड कोसळली; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

‘…तर निवृत्तीनंतर दोन कोटी मिळतील’; जाणून घ्या ‘या’ योजनेबद्दल

अनाथ मुलांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More