Top News महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांचं ते वक्तव्य खरं की खोटं?; राज्यपालांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई | शेतकरी भेटणार म्हणून राज्यपाल गोव्याला गेले, असा आरोप करुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. मात्र त्यांच्या या आरोपांवर राजभवनाने स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. राज्यपाल गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला दि. २५ रोजी संबोधित करणार असल्याने ते शेतकरी शिष्टमंडळाला भेटू शकणार नाहीत, असं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं, असं राज्यपाल भवनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.

शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी यासंदर्भात बोलणं झालं होतं आणि राज्यपाल अनुपस्थित नसल्याचं त्यांना कळवलं होतं. तसेच शिष्टमंडळाचं निवेदन स्वीकारण्यासाठी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार उपलब्ध असतील, असंही कळवण्यात आलं होतं. त्यामुळे राज्यपालांनी भेटीची वेळ दिली नाही हे वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यपालांना अभिनेत्री कंगणा राणावतला भेटायला वेळ आहे आणि शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल पाहिला नाही, असं शरद पवार म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या-

…तसा प्रयत्न केल्यास आम्ही शेतकऱ्यांचा मोर्चा रोखणार- विश्वास नांगरे पाटील

“शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रोहित पवार नक्कीच दुटप्पीपणा करत आहे आणि करत राहीन”

“राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागेल”

आठवले माफी मागा!; शेतकरी आंदोलनावरील वक्तव्याने राष्ट्रवादी आक्रमक

शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं; रामदास आठवलेंचा सल्ला

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या