‘द अ‌ॅक्सिडेंटल प्राइम’ मिनिस्टर पाहणार की ‘ठाकरे’??? शरद पवार म्हणतात….

‘द अ‌ॅक्सिडेंटल प्राइम’ मिनिस्टर पाहणार की ‘ठाकरे’??? शरद पवार म्हणतात….

कोल्हापुर |  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल कोल्हापुर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

उपस्थित पत्रकारांनी “द अ‌ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर पाहणार की ठाकरे”? असा खोचक प्रश्न शरद पवारांना विचारला. त्यावर उत्तर देताना मी चित्रपट फारसे पाहत नाही. मात्र संजय राऊतांनी ‘ठाकरे’ चित्रपट पाहण्याचं मला निमंत्रण दिलं आहे. मी ‘ठाकरे’ चित्रपट पाहायला उद्या मुंबईला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. 

आमच्या क्षेत्रात नेहमीच सिनेमे पहावे लागतात. राजकारणात दररोज सिनेमे दिसत असतात. भूमिका बदलत असते, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘ठाकरे’ आणि ‘द अ‌ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या दोन्ही चित्रपटांची जोरदार चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेेंचा ‘नीच’ तर संजय राऊतांचा ‘हरामखोर’ असा उल्लेख

-कमकुवत सरकार आणून भ्रष्टाचार करण्याचा काँग्रेसचा इरादा- नरेंद्र मोदी

-पंड्या व राहुलच्या जागी ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार भारतीय संघात संधी

-सरकारचं नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही, उद्या नाक दाबणार- मनसे

-… म्हणून काँग्रेसने चक्क पतंगावरच छापले राफेल प्रकरणाचे प्रश्न!

Google+ Linkedin