महाराष्ट्राच्या 4 मल्लांना शरद पवारांनी घेतलं दत्तक

मुंबई | महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी महाराष्ट्रातील चार मल्लांना दत्तक घेतलंय. पुढील तीन वर्षांच्या त्यांच्या परदेशातील प्रशिक्षण तसेच राहण्या-खाण्यासह संपूर्ण खर्च शरद पवार करणार आहेत. 

दुहेरी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारे, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता उत्कर्ष काळे, ‎महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि ‎उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत अशी दत्तक घेतलेल्या पैलवानांची नावं आहेत. 

होतकरु मल्लांना पैशांअभावी चांगलं प्रशिक्षण तसेच चांगला खुराक मिळत नाही, मात्र शरद पवार यांनी या चारही मल्लांना दत्तक घेतल्याने त्यांचा हा प्रश्न मिटला आहे.