मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते (Ncp) अजित पवार (Ajit Pawar) हेच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या सासूरवाडीतही महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा असं लिहिलेले बॅनर्स झळकले आहेत.
धाराशीव जिल्ह्यातील तेर ही अजित पवार (Ajit Pawar) यांची सासूरवाडी आहे. तेरच्या चौकाचौकात हे बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्सवर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचेही बॅनर्स आहेत.
राज्यात अजित पवार यांच्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. त्यांची भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली पोस्टर्सही लावली जात आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेससचे अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार म्हणाले की, असा वेडेपणा करू नका असं अनेकदा सांगितलं आहे. तसेच अजित पवारांनी देखील यावर स्पष्टीकरण दिलंय.
महत्वाच्या बातम्या-