बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संभाजीनगर म्हणा, नाहीतर धाराशिव म्हणा; याकडे मी गांभीर्यानं बघत नाही”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामकरणाबाबत एकमत नाही. यामुळे विरोधकांनीही हा मुद्दा लावून धरला आहे. अशातच औरंगाबादच्या नामांतराच्या विषयावरुन सुरु असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्यात वाद नाहीत. संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केलं नाही, असं शरद पवार म्हणालेत.

औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एकमत नसून परस्परविरोधी वक्तव्यं केली जात आहेत.

काँग्रेस औरंगाबादच्या नामांतराला विरोध करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र आपण वर्षानुवर्ष ही मागणी करत असल्याचं सांगत भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ असं म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून हेगडे देखील आता माझ्यावर आरोप करत असावेत”

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, फौजदारी गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाचं सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन!

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा ‘या’ तारखेपासून सुरु होणार- वर्षा गायकवाड

‘…म्हणून मी गप्प होते’; रेणू शर्माचे धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More