Sharad Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा विजयी झाल्या आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंना पराभवाची धूळ चारली आहे. या विजयावर शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी बारामतीतील विजयामागचं कारण सांगितलं आहे.
बारामतीतील जनतेची मानसिकता मला माहित आहे. माझी सुरुवात तिथूनच झाली असून मी 60 वर्ष तिथे काम केलं आहे, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत.
बारामतीमध्ये या विधानसभेच्या मतदारसंघात माझा स्वत:चा 60 वर्षांचा कामाचा अनुभव आहे. माझी सुरुवातच तिथून झाली आहे. तिथला सामान्य नागरिक आणि तिथली मानसिकता मला माहित आहे. मला असं वाटतं की, एका बारामीत विधानसभेत 35 हजारांचा लीड आहे, असं शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांचं काय झालं?, जाणून घ्या सगळ्यांचा निकाल
सर्वात मोठी बातमी! जालन्यात रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव; कल्याण काळे विजयी
मोठी बातमी! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधींचा दणदणीत विजय
रायगडने राखली अजित पवारांची लाज; 4 पैकी याच मतदारसंघात उघडलं विजयाचं खातं
महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया!