“देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे”
मुंबई | महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी, सीबीआय अशा यंत्रणांकडून त्रास दिला जात आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागानं अन्य लोकांना त्रास दिला. आता अजित पवार आणि त्यांच्या बहिणींना त्रास दिला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे, असं आवाहनही शरद पवार यांनी केलंय.
देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे. ज्याच्या हातात सत्ता दिली त्यांनी शहराचं वाटोळं केलं. त्यांना खड्यासारखं बाजूला करा. ज्यांनी शहर घडवलं त्या राष्ट्रवादीच्या हातात पुन्हा सत्ता द्या, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड मधील टाटा कंपनी जेव्हा राज्य सोडून निघाली होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे टाटा यांना भेटले. चव्हाण यांनी टाटांना सर्व सोयी देण्याचं आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं. पण तुम्ही पिंपरीत या असं सांगितलं आणि टाटा इथं आले, असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोघांचा मृत्यू
‘…तर शहरात पाय ठेवणार नाही’; अमोल कोल्हेंनी भाजपला दिलं चॅलेंज
राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी
भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी काँग्रेसचा चेहरा
शाकिबची दमदार कामगिरी! मलिंगाला मागे टाकत केला ‘हा’ नवा विक्रम
Comments are closed.