कोल्हापूर महाराष्ट्र

“भाजप सरकारने केलेल्या चुका महाविकास आघाडीला दुरूस्त कराव्या लागतील”

Loading...

कोल्हापूर | भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात अनेक चुका केल्या आहेत. त्या महाविकास आघाडीला दुरूस्त कराव्या लागतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मान्यताप्राप्त संघटनांना सोबत घेऊन सोडवावे लागतील. त्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी घ्यावी. अर्थखातं अजित पवारांकडे असल्याने ही जबाबदारी मी घेतो, असं शरद पवार यांनी सांगितलं.

Loading...

गेल्या पाच वर्षातील एसटीचा संचित तोटा पाच हजार कोटींचा आहे. यात बदल करायला पाहिजे. एसटीचा दर्जा सुधारूण प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा दिल्यास येत्या दोन तीन वर्षात हे चित्र नक्की बदलेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, एसटी महाराष्ट्राची जीवनरेखा आहे. एसटीकडे 18 हजार स्वत:च्या गाडय़ा आहेत. त्या धावण्यायोग्य नाहीत म्हणून 2 हजार नव्या गाडय़ा खरेदी करण्यात येणार आहेत. गेल्या चार वर्षांत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष केला; मात्र यापुढील काळात संघर्ष करावा लागणार नाही, अशी ग्वाही अनिल परब यांनी दिली.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

इंदुरीकर महाराजांना ‘बाऊन्सर’ची सुरक्षा; वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

इंदुरीकर महाराजांचा झटका; एकाच इशाऱ्यात यूट्यूब चॅनेलवाल्यांनी व्हिडीओ उडवले!

महत्वाच्या बातम्या- 

Loading...

3 दिवसात अर्धा किलो वजन कमी झालं- इंदुरीकर महाराज

‘अजून निवडणुकांमधली अंगावरची हळद उतरली नाही?’; सुनील तटकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

इंदुरीकर महाराजांना वाढता पाठिंबा; सोशल मीडियात #ISupportIndurikarMaharaj

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या