जळगाव | महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी भाजपचे नेते कितीही करत असले तरी महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.
आम्ही खेड्यापाड्यात राहणारे लोक आहोत. आम्हाला ज्योतिष कळत नाही. ज्योतिष कळणारे लोक भाजपमध्ये जास्त आहेत. पण त्यांचं भविष्य खरं ठरत नाही आणि अजून चार वर्षे तर खरं होणार नाही, असा खोचक टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे.
भाजप मिशन लोटस नावाने मोहिम उघडणार असल्याचं बोललं जात आहे. त्याने काही एक फरक पडणार नाही. मध्यवधी निवडणुकींचीही चर्चा आहे पण ही चर्चा कोणी आणली हे मला माहिती नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही बाब दुर्दैवी आहे. सरकार कोणाचंही असो महिलांवर अत्याचार होणं सरकारला शोभणारं नाही, अशा शब्दांत पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली.
ट्रेंडिंग बातम्या-
“परदेशी कन्येपासून झालेला राहुल गांधींचा जन्म देशासाठी मोठी चूक”
शरद पवारांची ‘ती’ मागणी वाढणार मुख्यमंत्री ठाकरेंची डोकेदुखी?
महत्वाच्या बातम्या-
भौतिक सुख वाढलं तरी लोक आंदोलन करत आहेत- मोहन भागवत
शरद पवारांकडून नाशिक दौरा अचानक रद्द; उद्या राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची महत्वाची बैठक
कारवाई केली तर इंदुरीकरांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू- सुरेश धस
Comments are closed.