पतीच्या चौकशीमुळे चित्रा वाघ घाबरल्या होत्या- शरद पवार

पुणे |  राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्याअगोदर त्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटल्या. या भेटीत काय झालं? याचा खुलासा पवार यांनी काल पुण्यात केला आहे.

चित्रा वाघ माझ्याकडे आल्या होत्या. त्यांचे पती किशोर वाघ यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या घाबरलेल्या होत्या. आमच्या बचावासाठी मी पक्ष सोडून जात आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे

आपले पती या प्रकरणातून सहीसलामत सुटावेत हे चित्रा वाघ यांचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी त्यांना भाजपची मदत लागेल. त्यामुळेच चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असं बोललं जातंय.

दरम्यान, राष्ट्रवादीने वाघ यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सुद्धा टाकली होती. मात्र पतीवर ट्रॅप होताच त्या शांत झालेल्या पहायला मिळाल्या.

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ महिला आमदार म्हणतात… शरद पवार हेच आमचे कप्तान!

-“राष्ट्रवादी युवकमध्ये एकलव्य आहेत; साहेबांसाठी अंगठाच काय देहसुद्धा देऊ”

-काय उत्तम रित्या परतफेड केलीत; पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना आव्हाडांची चपराक

-‘हा’ आमदार म्हणतो काहीही होऊदे मी मात्र पवारांसोबतच!

-शरद पवारांकडून मोठा गौप्यस्फोट; मुख्यमंत्र्यांवर केले ‘हे’ गंभीर आरोप