महाराष्ट्र मुंबई

मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू- शरद पवार

मुंबई | धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. मला भेटून एकंदर त्यांच्या आरोपाची स्थितीची सविस्तर माहिती मला दिली, असं शरद पवारांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे शरद पवार  म्हणाले.

हे प्रकरण असं होईल, व्यक्तीगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा, त्यामुळे त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली आणि कोर्टाचा एकप्रकारचा एक आदेश होता त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही, असंही पवारांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“घरात उकिरडा माजलाय आणि राष्ट्रवादीचे नेते जगाला शहाणपण शिकवतात”

“मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा”

जावयाच्या चुकीची शिक्षा सासऱ्याला का व्हावी?- जयंत पाटील

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट; कटुतेवर मात करत….

व्हाॅट्सअपला धक्के सुरुच; ‘या’ बड्या कंपन्यांचा बायबाय; सिग्नलला दिली पसंती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या