देश

धनंजय मुंडेंवरील आरोपांबाबत चौकशी होऊ द्या, ते दोषी आढळल्यास…- शरद पवार

पणजी | सत्य बाहेर येऊ द्या. धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.

संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून शरद पवार सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांंशी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे प्रकरणावर भाष्य केलं.

काही जणांचा बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे. या प्रकरणाची चौकशी होऊ द्या. सत्य समोर येईल, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, आमदार चर्चिल आलेमांव व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

राज्यातील ‘इतक्या’ कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला- छगन भुजबळ

दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती!

“चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो”

राज्यातील नोकर भरतीबाबत नितीन राऊत यांची मोठी घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या