महाराष्ट्र मुंबई

प्रताप सरनाईकांवरील ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे, असा आरोप शरद पवारांनी केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राज्यात वेगळ्या पद्धतीने राज्य चालवण्याचा‌ प्रयत्न आम्ही करतोय. तिन्ही पक्षाच्या आघाडीकडून वर्षभर चांगलं सरकार चालवण्याचा आमचा‌ प्रयत्न राहिला असून संकटं आली, कधी अतिवृष्टी झाली तरीही सरकार सामान्य माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं, असं पवार म्हणाले.

शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत घडत असल्याचं आज टिव्हीवर पहायला मिळत आहे. राज्य सरकार सर्वांवर मात करुन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं पवारांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर अखेर सापडले!

“…तर केंद्र सरकार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करेल”

ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

आम्ही या महाष्ट्राची औलाद आहोत, शहीद होऊ पण…- संजय राऊत

‘उद्याचं चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण माहीत नव्हता’; शरद पवारांचा दानवेंना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या