बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ खडसेंबाबत शरद पवारांचा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट!

मुंबई |एकनाथ खडसे हे गेल्या काही महिन्यांपासून संपर्कात आहेत. मात्र त्यांचं पक्षात येण्याबाबात अजुन निश्चित काही सांगता येत नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंबाबत गौप्यस्फोट केला आहे. 

त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे काय पर्याय शोधतील हे आत्ताच काही सांगता येत नाही. पर्याय हा लगेच तयार होत नसतो, असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यातच अजित पवार हे बीडचा दौरा अर्धवट सोडून आज नाथाभाऊंच्या भेटीसाठी गेले त्यामुळे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दोन याद्या प्रसिद्ध होऊनही उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे खडसे नाराज आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बीडचा नियोजित दौरा रद्द करून जळगावला ते एकनाथ खडसे यांची भेट घेण्यासाठी पोहचले असल्याचं कळतंय.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर तो भाजपसाठी मोठा धक्का असेल आणि राष्ट्रवादीने भाजपला दिलेला मोठा शह देखील असेल.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More